नांदेड - छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे शिवराज्याभिषेक दिनी किनवट शहरात आगमन...
रायगडावरील पवित्र माती कलश शोभायात्रेचे आमदार भीमराव केराम यांच्याकडून आयोजन!
प्रतिनिधी : मजहर शेख, नांदेड
दि,०५:- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दिनांक ०६ जून रोजी किनवट शहरात महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आगमन होणार आहे.महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण नगर परिषद समोरील नियोजित जागेच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर किनवट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते व नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ.मृणाल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिपूर्वक होणार आहे,तत्पूर्वी पुतळ्यासोबत रायगडावरील पवित्र मातीची कलश यात्रा श्रीक्षेत्र माहूर येथून सारखणी मार्गे किनवटला पोहोचणार असल्याने शिवप्रेमी बांधवांनी जिथे शक्य असेल तिथे पुतळ्याचे पूजन अथवा पुष्पवृष्टी करावी,शिवाय या दैदीप्यमान क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण किनवट - माहूर विधानसभा मतदार संघातील जनता या कलश यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आमदार भीमराव केराम यांनी केले आहे.
किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे दृष्टे आमदार भीमराव केराम यांनी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला व येत्या ०६ जून रोजी मुंबई येथून महाराजांचा हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार झालेल्या पुतळ्याचे ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनी किनवट शहरात आगमन होत आहे.या बरोबरच आमदार भीमराव केराम यांनी रायगडावरील पवित्र मातीची भव्य कलश यात्रेचे देखील आयोजन केले असून शिवप्रेमींसाठी हा कार्यक्रम पर्वणी ठरणार आहे.शोभायात्रेची सुरूवात देवभूमी श्री क्षेत्र माहूर येथून ०६ जून २०२३ रोजी सकाळी ठिक १० वाजता सुरु होऊन माहूर,वाई बाजार, सारखानी,राजगड,घोटी फाटा ते किनवट असा प्रवास करत संध्याकाळी ६ वाजता किनवट येथे यात्रा पोहचेल अशी माहिती आमदार भीमराव केराम यांच्या लोकार्पण जनसंपर्क कार्यालयाचे स्विय सहाय्यक प्रकाश कुडमते यांनी दिली आहे.

