Type Here to Get Search Results !

राहुरी - पोपट कटारे यांची पो. उप निरीक्षकपदी वर्णी, राहुरी पोलिस ठाण्यात नियुक्ती.

 पोपट कटारे यांची पो. उप निरीक्षकपदी वर्णी, राहुरी पोलिस ठाण्यात नियुक्ती.



तालूक्यातील विविध मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदन चा वर्षाव.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार पदावर काम करीत असलेले पोपट दशरथ कटारे यांना नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली. आणि आज त्यांनी राहुरी पोलिस ठाण्यात पदभार घेतला. या निमित्त त्यांचा यथोचित सत्कार करून सन्मानित करण्यात आले. 


पोपट कटारे यांनी अतिशय कठीण परिस्थितीत १९९० मध्ये आपले प्राविण्य दाखवून ते अहमदनगर येथे पोलीस भरती मध्ये पात्र होऊन ते पोलीस दलात भरती झाले होते. 


कॉन्स्टेबल झाल्यानंतर त्यांनी प्रथम श्रीरामपूर शहर, राहरी, सोनई, एमआयडीसी अहमदनगर व शनिशिंगणापूर आता त्यानंतर परत राहुरी अशा ठिकाणी त्यांनी प्रामाणिकपणे नोकरी केली.


त्यानंतर २०१३ साली त्यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा देऊन त्यामध्ये ते उत्तीर्ण झाले. त्यांची पोलीस उप निरीक्षकपदी नूकतीच बढती झाली. बढती झाल्यानंतर त्यांना राहुरी पोलिस ठाण्यात नियुक्त करण्यात आले. आज दिनांक ६ जून रोजी त्यांची राहुरी पोलिस ठाण्यात पदभार घेतला. 


या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र बोरकर, पत्रकार मनोज साळवे, पत्रकार दत्तात्रय तरवडे, गोटीराम जाधव, शिवाजी वराळे, पोलिस नाईक शिवाजी खरात यांनी कटारे यांना शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. 


पोपट कटारे यांच्या या यशामुळे त्यांचे राहरी तालुक्यातील सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.