Type Here to Get Search Results !

राहुरी - गांजा पिणाऱ्या एकाला रंगेहाथ पकडून ताच्यावर कारवाई केली.

 गांजा पिणाऱ्या एकाला रंगेहाथ पकडून ताच्यावर कारवाई केली.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी पोलिस पथक दिनांक ३ जून २०२३ रोजी शहर हद्दीत गस्त घालत होते. तेव्हा शनी मंदिर परिसरात एकाला गांजा पित असताना रंगेहाथ पकडून ताच्यावर कारवाई केली. 


राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई जयदिप शिवनाथ बडे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, राहुरी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र वर्पे यांच्या आदेशावरून पोलिस उप निरीक्षक निरज बोकील, पोलिस नाईक अमित राठोड, आजिनाथ पालवे व जयदिप बडे आदिंचे पोलिस पथक दिनांक ३ जून २०२३ रोजी राहुरी शहर हद्दीत गस्त घालत होते. 


सायंकाळी ६.३० वाजे दरम्यान शहरातील शनीचौक येथील मुक्ताई मंदीराच्या आडोशाला एक इसम तोंडातुन चिलीमच्या साह्याने धुर काढताना दिसुन आला. तेव्हा त्याला जागीच पकडुन ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सतीश प्रल्हाद पवार, वय ४१ वर्षे, रा.गणपती घाट, कोळीवाडा, ता. राहुरी. असे सांगीतले. 


त्यानूसार सतीश प्रल्हाद पवार याच्यावर गुन्हा रजि. नं. ६०५/२०२३ एन. डी. पी. एस. कायदा १९८५ कलम ८ (क) सह २७ प्रमाणे अमली पदार्थाचे सेवन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.