Type Here to Get Search Results !

राहुरी - वाळू उपसा करण्यास मज्जाव केल्याने वाळू तस्करांकडून कोरडे कुटुंबीयांना मारहाण.

 वाळू उपसा करण्यास मज्जाव केल्याने वाळू तस्करांकडून कोरडे कुटुंबीयांना मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


वाळू उपसा करण्यास मज्जाव केल्याने वाळू तस्करांनी राहुरी तालूक्यातील कोळेवाडी येथील राजू कोरडे व त्यांच्या कुटुंबीयांना लाथा बूक्क्यांनी व दांड्याने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिली. दिनांक २ जून २०२३ रोजी ही घटना घडलीय. 


राजु एकनाथ कोरडे, वय २५ वर्षे, हे राहुरी तालूक्यातील कोळेवाडी येथे त्यांच्या कुटुंबासह राहत आहेत. त्यांना शेतातून तसेच घरातून येण्या जाण्यासाठी ओढयातून रस्ता आहे. त्या ओढयातून तेथील गंगाधर दिनकर कोरडे हे वाळु काढण्याचे काम करतात. 


राजू कोरडे हा त्यांना म्हणाला कि, ओढयातून वाळु काढू नका. आमचा रस्ता बंद होईल. त्यानंतरही त्यांनी वाळू उपसा सुरूच ठेवला. त्यामुळे राजू कोरडे यांनी राहुरी येथील तहसीलदार यांना फोन करुन सदर माहिती दिली. तेव्हा तहसीलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून टेम्पो जप्त केला. 


या गोष्टीचा राग मनात धरुन दि. २ जून २०२३ रोजी रात्री ९.३० वाजे दरम्यान आरोपी राजू कोरडे याच्या घरी गेले. आणि म्हणाले की, तूम्ही सर्वजण खूप माजले आहात. आमची गाडी पकडुन देता काय? असे म्हणून त्यांनी घाणघाण शिवीगाळ केली. आणि राजू कोरडे व त्याच्या कुटुंबीयांना लाथा बूक्क्यांनी व दांड्याने मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.


घटनेनंतर राजू एकनाथ कोरडे याच्या फिर्यादीवरून आरोपी गंगाधर दिनकर कोरडे, भावडया गंगाराम कोरडे, दिपक सखाराम कोरडे, गोविंद उत्तम कोरडे, गणेश बाजीराव कोरडे, सर्व रा. कोळेवाडी, ता. राहुरी. या पाच जणांवर गुन्हा रजि. नं. ६०४/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ५०४, ५०६, १४३, १४७ प्रमाणे मारहाण, शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.