Type Here to Get Search Results !

राहुरी - बंधाऱ्यावरील ३ लाख ७५ हजार रुपए किंमतीच्या प्लेटा चोरट्यांनी पळवील्या.

 बंधाऱ्यावरील ३ लाख ७५ हजार रुपए किंमतीच्या प्लेटा चोरट्यांनी पळवील्या.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


देवनदीच्या बंधाऱ्यावरील ३ लाख ७५ हजार रुपए किंमतीच्या प्लेटा कोणीतरी अज्ञात भामट्यांनी चोरून नेण्यात. ही घटना राहुरी तालूक्यातील धामोरी खुर्द परिसरात दिनांक २ जून रोजी उघडकीस आली. 


राहुरी तालूक्यातील धामोरी खुर्द हद्दीत देवनदीवर जहांगीर बाबा देवस्थान शेजारी कोल्हापुरी पध्दतीचा बंधारा आहे. बंधा-यावर पाणी अडवण्यासाठी एकुण ७९ लोखंडी प्लेटा बसवलेल्या आहेत. त्याची देखभाल सध्या ग्रामपंचायत करत आहे. दि. २ जून २०२३ रोजी सदर बंधा-यावरील प्लेटा चोरी गेल्याची माहिती मिळाली. 


तेव्हा ग्रामसेवक माया वाघ, सरपंच सुनिता पवार, उपसरपंच बापु जाधव, कामगार पोलीस पाटील खंडु जाधव यांनी बंधा-यावर पाहणी केली असता ३०० किलो वजनाच्या ३ लाख ७५ हजार रुपए किंमतीच्या २५ लोखंडी प्लेटस कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेल्याचे लक्षात आले. 


धामोरी खुर्द ग्रामपंचायत मधील किशोर रामदास ससाणे याच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजि. नं. ६०१/२०२३ भादंवि कलम ३७९ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.