Type Here to Get Search Results !

राहुरी - झाडाचे आंबे तोडण्यास मज्जाव केल्याने हरिश्चंद्रे यांना लाथा बूक्क्यांनी व काठीने मारहाण.

 झाडाचे आंबे तोडण्यास मज्जाव केल्याने हरिश्चंद्रे यांना लाथा बूक्क्यांनी व काठीने मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


विद्यापीठ च्या मालकीचे आंबे तोडण्यास मज्जाव केल्याने तीन आरोपींनी मिळून एका सुरक्षा रक्षकाला लाथा बूक्क्यांनी व काठीने मारहाण करण्यात आली. ही घटना राहुरी तालूक्यातील विद्यापीठ परिसरात दिनांक २ जून २०२३ रोजी घडलीय. याबाबत तिघा जणांवर राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


गणेश गोपीनाथ हरिश्चंद्रे, वय ४० वर्षे, रा. खडांबे खुर्द, ता. राहुरी हे महात्मा फुले कृषी विद्यापीठात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. दिनांक २ जून २०२३ रोजी ११.३० वाजे दरम्यान ते विद्यापीठाच्या रोप वाटिकेत गस्त घालत होते. तेव्हा तिघेजण रोपवाटीकेत आंबे तोडताना दिसले. 


त्यावेळी गणेश हरिश्चंद्रे यांनी त्या तिघांना आंबे तोडण्यास मज्जाव केल्याने त्या तिघांनी गणेश हरिश्चंद्रे यांना लाथा बूक्क्यांनी व काठीने मारहाण केली. तेव्हा हरिश्चंद्रे यांनी आरडाओरडा केला असता ते तिघेजण मोटरसायकलवर पसार झाले. या घटनेत हरिश्चंद्रे यांचे पाकीट गहाळ झाले.


घटनेनंतर गणेश गोपीनाथ हरिश्चंद्रे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानूसार आरोपी दिपक पवार, आकाश पवार, दोघे रा. डिग्रस, ता. राहुरी. तसेच एक अनोळखी इसम अशा तिघांवर गुन्हा रजि. नं. ६००/२०२३ भादंवि कलम ३२३, ३२४, ४२७, ५०४, ३४ प्रमाणे मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.