Type Here to Get Search Results !

राहुरी - रात्रीच्या दरम्यान महसूल पथकाला हुलकावनी देऊन वाळू तस्कर टेम्पो घेऊन पसार.

 रात्रीच्या दरम्यान महसूल पथकाला हुलकावनी देऊन वाळू तस्कर टेम्पो घेऊन पसार.



सागर बिडवेसह एकावर चोरीचा गुन्हा दाखल.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


रात्रीच्या दरम्यान गस्तीवर असलेल्या राहुरी येथील महसूल पथकाने दिनांक ३ जून २०२३ रोजी राहुरी शहर हद्दीत कारवाई करून चोरटी वाळू वाहतूक करणारा एक टेम्पो पकडला. मात्र टेम्पो चालक महसूल पथकाला हूलकावनी देऊन टेम्पो घेऊन पसार झाला. मात्र दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


राहुरी येथील कामगार तलाठी रविंद्र मच्छिद्र बाचकर, वय ३३ वर्षे, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दिनांक ३ जून २०२३ रोजी रात्री १२.२० वाजे च्या सुमारास तहसीलदार चंद्रजीत राजपूत, निवासी नायब तहसिलदार संध्या दळवी, तलाठी काळे, गुसिगे आदि महसूल विभागाचे पथक रात्रीच्या दरम्यान गस्त घालत होते. 


तेव्हा शहर हद्दीतील स्टेशन रोड परिसरात नाका नं. ५ येथे एक टेम्पो चोरटी वाळू वाहतूक करताना दिसला. त्यावेळी महसूल पथकाने त्या टेम्पोला थांबवून पाहणी केली असता टेम्पोमध्ये चोरीची वाळू दिसून आली. वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता तो उडवा उडवीचे उत्तरे देवु लागला. गाडीचे मालका बाबत विचारणा केली असता त्याने सागर बिडवे याचा टेम्पो असल्या बाबत त्यांने सांगितले.


 त्यानंतर आम्ही त्यास टेम्पो तहसिल ऑफिस मध्ये घेवुन चल असे म्हणाल्या नंतर त्याने त्याचे ताब्यातील टेम्पो घेऊन नगर मनमाड हायवे रोडचे दिशेने पसार झाला. महसूल पथकाने त्याचा पाठलाग केला. परंतू तो भरधाव वेगात निघून गेला. 


कामगार तलाठी रविंद्र मच्छिद्र बाचकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी सागर बिडवे, राहणार राहुरी तसेच एक अनोळखी तरूण या दोघांवर गुन्हा रजि. नं. ५९९/२०२३ भादंवि कलम ३७९ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम १५, ३ प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.