रिपाइं कडून अजिंक्य शिंदेंचा सत्कार
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, राहुरी तालुक्याच्या वतीने नुकतीच एल.आय.सी. 'डेव्हलपमेन्ट ऑफीसर, म्हणून निवड झालेल्या अजिंक्य (बच्चू) शिंदे यांचा सत्कार तालुका अध्यक्ष विलास साळवे यांनी आयोजित केला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार राजेंद्र साळवे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष विलास साळवे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजिंक्य शिंदे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच त्यांचा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी सागर साळवे, सुनिल चांदणे, सचिन साळवे, पत्रकार विलास गिर्हे, ग्रामसेवक अमोल साळवे यांनी मनोगत व्यक्त केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास प्रदिप मोरे, अरुण साळवे, सुधाकर साळवे, दिपक साळवे, रुपक साळवे, राजेश साळवे, ब्रूसली साळवे, मयूर सूर्यवंशी, राजेंद्र बागुल, अतुल त्रिभुवन, पिंटू आल्हाट, रवि पलघडमल, पंछी शिरसाठ, संतोष दाभाडे, स्वप्नील हिवाळे, बंटी हिवाळे, बबलू धोत्रे, गोपाळ दिवे, सुनील गुलदगड, मनोज वाघ, दीपक गागरे आदी उपस्थित होते.
