Type Here to Get Search Results !

राहुरी - सुगंधी तंबाखूचा मावा विक्री करताना दोघांना रंगेहाथ पकडून गजाआड केले.

 सुगंधी तंबाखूचा मावा विक्री करताना दोघांना रंगेहाथ पकडून गजाआड केले.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


शासनाची बंदी असलेला मावा चोरून विक्री करत असताना तालूक्यातील सोनगाव येथे दोघांना राहुरी पोलीस पथकाने दि. १० जुलै २०२३ रोजी रंगेहाथ पकडून गजाआड केले. तसेच त्यांच्याकडून सुगंधी तंबाखू व सुपारी असलेला मावा जप्त करण्यात आलाय.


राहुरी येथील पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या आदेशानुसार दि. १० जुलै २०२३ रोजी दुपारी २.३० वाजे दरम्यान पोलिस नाईक अमित राठोड, सचिन ताजणे, प्रमोद ढाकणे, दिपक फुंदे आदि पोलिस पथकाने राहुरी तालूक्यातील सोनगाव येथे छापा टाकला. 


त्यावेळी सोनगाव येथे संत सावता महाराज बाजारपेठेतील फिजा पान स्टाॅल व तांबोळी पान स्टाॅल येथे दोन इसम महाराष्ट्र शासनाची बंदी असलेला पान सुपारी पासुन बनविलेला मावा अवैधरित्या त्यांचे टपरी मध्ये विक्री करीत असताना दिसून आले. 


पोलिस पथकाने सदर दोन्ही पान टपरीवर छापा टाकून सुगंधी तंबाखू पासून बनवीलेला मावा जप्त केलाय. तसेच दोघां जणांना ताब्यात घेऊन गजाआड केले. 


पोलीस नाईक दीपक रामदास फुंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी जावेद उस्मान तांबोळी, वय ४६ वर्षे, तसेच राजमोहम्मद शब्बीर तांबोळी, वय ४१ वर्षे, दोघे रा. सोनगाव, ता. राहुरी. यांच्यावर गुन्हा रजि. नं. ७५८/२०२३ भादंवि कलम २७२, २७३, १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.