Type Here to Get Search Results !

राहुरी - पोलिसांचा मटका अड्ड्यावर छापा, एकजण गजाआड.

पोलिसांचा मटका अड्ड्यावर छापा, एकजण गजाआड.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी पोलीस पथकाने तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दिनांक ८ जुलै २०२३ रोजी मटका अड्ड्यावर छापा टाकून रोख रकमेसह मुद्देमाल ताब्यात घेऊन एका आरोपीला गजाआड केले. तसेच त्याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथे मटका सुरू असल्याची गुप्त खबर मिळाल्या नंतर पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ८ जुलै २०२३ रोजी दुपारी १ वाजे दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे, हवालदार ज्ञानदेव गर्जे, पोलिस नाईक रमेश शिंदे, दिपक फुंदे आदि पोलिस पथकाने देवळाली प्रवरा येथे छापा टाकला. 


त्यावेळी एक इसम एका पत्र्याच्या शेडमध्ये मटका जुगाराच्या चिठ्ठया समोर उभ्या असलेल्या लोकांना देवुन त्यांचेकडुन पैसे स्विकारत असतांना दिसला. पथकाने त्याला जागीच पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे काही रोख रक्कम व मटका जूगार खेळण्याचे साहित्य मिळून आले. 


पोलिस नाईक दिपक रामदास फुंदे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी आलीम बाबु शेख, वय २६ वर्षे, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी. याच्यावर गुन्हा रजि. नं. ७५०/२०२३ महाराष्ट्र जूगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.