महिलेचा हाथ धरत तू मला खूप आवडतेस असे म्हणत अंगावर पडून विनयभंग.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
३७ वर्षीय महीलेचा हात धरून तू मला खूप आवडतेस, असे म्हणून त्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करण्यात आले. ही घटना राहुरी तालूक्यातील तमनर आखाडा येथे दिनांक ७ ऑगस्ट २०२३ रोजी घडलीय.
या घटनेतील आरोपी सचिन सोपान कोपनर, रा. तमनर आखाडा, ता. राहुरी. हा दिनांक ७ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ४.३० वाजे दरम्यान राहुरी तालूक्यातील तमनर आखाडा येथे शेतात जात होता.
त्यावेळी त्याने एका ३७ वर्षीय महिलेचा हाथ धरून तू मला खूप आवडतेस असे म्हणून त्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. त्यानंतर आरोपी त्या महिलेच्या अंगावर पडला. महिलेने त्याच्या तावडीतून सूटण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा आरोपीने पिडीत महिलेच्या कानफटात मारली तसेच तिच्या छातीला लाथ मारली. घटनेनंतर पिडीत महिलेने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली.
त्या महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन सोपान कोपनर रा. तमनर आखाडा, ता. राहुरी. याच्यावर गुन्हा रजि. ८५८/२०२३ भादंवि कलम ३५४, ३२३ प्रमाणे विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आव्हाड हे करीत आहेत.
