मागील भांडणाच्या कारणावरुन दोघा भावांना लाकडी दांडा व गजाने बेदम मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालूक्यातील मांजरी येथे मागील भांडणाच्या कारणावरुन दोघा भावांना शिवीगाळ करत लाकडी दांडा व लोखंडी गजाने बेदम मारहाण केल्याची घटना दिनांक ८ मार्च २०२४ रोजी रात्री घडली.
दत्तात्रय अर्जुन माळी, वय १८ वर्षे, रा. मांजरी, ता. राहुरी, ह. मु. गणेशवाडी, ता. नेवासा. या तरुणाने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. ८ मार्च २०२४ रोजी रात्री ८ वाजे दरम्यान आकाश पोपट माळी, किरण काशिनाथ पवार, कुणाल कैलास पवार हे राहुरी तालूक्यातील मालुंजा खुर्द येथे एकलव्य जयंतीची मिरवणुक करुन घरी जात होते.
तेव्हा मागील भांडणाच्या कारणावरुन आरोपींनी त्यांना मारहाण केली. तेव्हा दत्तात्रय अर्जुन माळी व त्याचा चुलत भाउ सागर पोपट माळी हे मांजरी येथील हॉटेल सैराट समोरील पाथरे खुर्द ते मांजरी रोडवर गेले असता आरोपींना त्यांना शिवीगाळ करत लाकडी दांडा, लोखंडी गजाने बेदम मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
दत्तात्रय अर्जुन माळी याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी अजय विनायक बर्डे, सचिन बाप्पु माळी दोघे रा. मांजरी, ता. राहुरी व दोन अनोळखी इसम अशा चार जणांवर गून्हा रजि. नं. २६३/२०२४ भादंवि कलम ३२३, ३२४, ३४, ५०४, ५०६ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गून्हा दाखल करण्यात आला.
