पोलिस पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून जूगाऱ्यांना ताब्यात घेतले.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी तालूक्यातील उंबरे येथे दिनांक ८ मार्च २०२४ रोजी राहुरी पोलिस पथकाने छापा टाकून पाच जूगाऱ्यांना मुद्देमाला सह ताब्यात घेऊन गजाआड केले होते. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली.
दिनांक ८ मार्च २०२४ दुपारच्या दरम्यान राहुरी तालूक्यातील उंबरे येथे जुगार अड्डा सुरु असल्याची गुप्त खबर पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली. त्यानुसार पोलिस नाईक सुरज गायकवाड, सचिन ताजणे, प्रमोद ढाकणे, नदिम शेख, अंकुश भोसले आदि पोलिस पथकाने उंबरे गावात छापा टाकला.
त्यावेळी तेथे एका बाभळीच्या झाडाखाली तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या पाच जूगाऱ्यांना पकडून ताब्यात घेतले. तसेच रोख रक्कमेसह जूगार खेळण्याचे साहित्य पोलिस पथकाने जप्त केले.
पोलिस शिपाई अंकुश बाबासाहेब भोसले यांच्या फिर्यादीवरून आरोपी रमेश शामराव कोल्हे, वय ५३ वर्षे, रा. उंबरे, अशोक मच्छिंद्र वैरागर, वय ४४ वर्षे, रा. ब्राम्हणी, सुरेश भाऊसाहेब गायकवाड, वय ४३ वर्षे, रा. उंबरे अरुण तात्याबा गायकवाड, वय ५० वर्षे, रा. उंबरे, प्रकाश भिकाजी ढोकणे, वय ६२ वर्षे, रा. उंबरे, ता. राहुरी.
या पाच जणांवर गून्हा रजि. नं. २५२/२०२४ भादंवि कलम १२ अ प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपींची जामीनावर सुटका करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
