जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर दोन कामगारांची लूटमार.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
जागतिक महिला दिनानिमित्त दि. ७ मार्च २०२४ रोजी सायंकाळी राहुरी शहरातील वाय.एम.सी.ए मैदानावर खा. सुजय विखे यांच्या वतीने महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रम झाल्यानंतर त्या ठिकाणी लूटमारी दोन घटना घडल्या असून पोलिस ठाण्यात गून्हा दाखल करण्यात आला.
भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांच्या संकल्पनेतून आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून राहुरी येथे नामवंत सेलिब्रेटींच्या उपस्थितीत दि. ७ मार्च २०२४ रोजी सायंकाळी राहुरी शहरातील वाय.एम.सी.ए मैदानावर तालूक्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
त्या ठिकाणी सुंदर अशी विद्युत रोषणाई व मंडप डेकोरेशन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर दिनांक ९ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजे दरम्यान त्या ठिकाणी मंडप सोडण्याचे काम सुरु होते. यावेळी मंडप कामगार संदिप महेश मसकेले, वय १९ वर्षे, तसेच योगेश रामविलास उईके, वय २० वर्षे, दोघे रा. कायनाटीक चौक, अजय एजन्सीच्या पाठीमागे हे दोघे कामगार मंडप सोडत होते.
त्यावेळी दोन भामटे आले आणि दोघा कामगारांच्या खिशात जबरदस्ती हाथ घालून पैसे शोधू लागले. कामगारांनी विरोध केला असता भामट्यांनी त्यांना दमदाटी करुन दोघांचे मोबाईल हिसकावून घेतले आणि घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेनंतर दोन्ही मंडप कामगारांनी राहुरी पोलिस ठाण्यात स्वतंत्र फिर्यादी दिल्या. त्यानूसार अज्ञात दोन इसमां विरोधात लूटमारीचा गून्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
