२५ वर्षीय विवाहित तरुणीच्या घरात घुसून मारहाण करत विनयभंग केला.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
एक २५ वर्षीय विवाहित तरुणी दि. १८ जून २०२४ रोजी सकाळच्या दरम्यान घरात एकटीच असताना आरोपी नवनाथ कणसे हा तीच्या घरात घूसला. आणि भांडण झाल्याची केस करु नको, अशी दमदाटी करुन त्याने पिडीत तरुणीला लाथा बूक्क्यांनी मारहाण करुन तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. ही घटना राहुरी तालूक्यातील मालूंजे खुर्द येथे घडली.
१७ जून २०२४ रोजी पिडीत तरुणी व आरोपी नवनाथ कणसे यांच्यात वाद झाले होते. पंरतु गावातील विषय असल्या कारणाने तरुणीने तक्रार दिली नव्हती. पिडीत २५ वर्षीय विवाहित तरुणीने राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, पिडीत तरुणी दि. १८ जून २०२४ रोजी सकाळी ८ वाजे दरम्यान तीच्या घरात एकटीच होती.
तेव्हा आरोपी नवनाथ कणसे हा तीच्या घरात जबरदस्तीने घूसला. आणि तुम्ही केस करु नका नाहीतर तुला जिवे ठार मारुन टाकीन. तेव्हा पिडीत तरुणी त्यास म्हणाली की, आम्ही ठरवु काय करायचे ते, असे म्हणाल्याचा राग आल्याने त्याने आरोपी नवनाथ कणसे याने पिडीत तरुणीला लाथा बूक्क्यांनी मारहाण केली.
तसेच तीला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तेव्हा पिडीत तरुणीने आरडाओरडा केला असता नवनाथ कणसे याने तेथून पळ काढला. घटनेनंतर पिडीत तरुणीने राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली.
त्या फिर्यादीवरून आरोपी नवनाथ धोडिंभाऊ कणसे, रा. मालुंजे खुर्द, ता. राहुरी. याच्यावर गून्हा रजि. नं. ७२५/२०२४ भादंवि कलम ३५४, ४५२, ३२३, ५०६ प्रमाणे विनयभंग, मारहाण व धमकी दिल्याचा गून्हा दाखल करण्यात आला.
या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार अशोक शिंदे हे करीत आहे.
