राज्य मराठी पत्रकार संघाची पारनेर तालुका शाखेची नूतन कार्यकारिणी जाहीर.
राज्याचे प्रदेशाध्यक्ष संजय भोकरे, महासचिव विश्वास आरोटे व जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाचपुते यांची मान्यता.
पारनेर दि.१९ जून
गेली तीन महिन्यांपूर्वी राज्य मराठी पत्रकार संघाने महासचिव विश्वास आरोटे यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाचपुते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपाध्यक्ष विनोद गायकवाड,पारनेर तालुका अध्यक्ष बाबाजी वाघमारे , तालुका उपाध्यक्ष श्रीनिवास शिंदे , राम तांबे , संपतराव कपाळे यांची नियुक्ती जाहीर केली होती. नुकतीच पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक ज्येष्ठ मार्गदर्शक मुकुंदराव निघोजकर, संजय मोरे, ज्ञानेश्वर लोंढे व सतिष रासकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा उपाध्यक्ष विनोद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पारनेर येथे घेण्यात आली यावेळी तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली व राज्याचे पदाधिकाऱ्यांना याबाबत संपर्क करण्यात आला त्यांनीही नूतन कार्यकारिणीला मान्यता देऊन अभिनंदन केले आहे.यामध्ये कार्याध्यक्ष - शिरिष शेलार, उपकार्याध्यक्ष - भास्करराव कवाद, सचिव - लतिफ राजे, सहसचिव - जयदीप कारखीले, खजिनदार - अविनाश भांबरे, प्रसिद्धी प्रमुख - विजय रासकर, प्रवक्ते - जयसिंग हरेल, पारनेर शहराध्यक्ष - संतोष सोबले, निघोज शहराध्यक्ष - आनंद भुकन, कार्यकारिणी सदस्य - अनिल चौधरी, विलास शेंडकर, अभिजित कपाळे, सागर आतकर, संदीप गाडे, भगवान श्रीमंदीलकर, किरण थोरात, स्वप्नील भालेराव, योगेश खाडे, संदीप ईधाटे ॲड .गोपाळे, मंगेश वराळ पाटील, रोहन उनवणे आदिंची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
चौकट.
पारनेर तालुका मराठी पत्रकार संघ कार्यक्षमपणे तालुक्यात काम करीत असून सर्व पदाधिकारी अनुभवी असून सामाजिक सेवेचा त्यांना मोठा अनुभव आहे.बातमी माध्यमातून तालुका विकासाला गती मिळाली पाहिजे सर्व सामान्य जनतेचे कामे झाली पाहिजेत यासाठी प्रयत्न करण्याची गरज असून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारीतेला जगात राजमान्यता मिळाली असून सामाजिक कामांच्या माध्यमातून एक समाजापुढे आदर्श निर्माण करण्याचे काम पत्रकारांकडून झाले पाहिजे. पारनेर तालुका कार्यकारिणी ही सर्वोत्तम असून जुन्या नव्यांचा समन्वय साधीत सर्वांनी विचारविनिमय करीत कार्यकारिणी तयार केली असून राज्य मराठी पत्रकार संघ तसेच जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पाठबळ सातत्याने मिळणार आहे.
दत्तात्रय पाचपुते
जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाचपुते
फोटो ओळी -
राज्य मराठी पत्रकार संघाची पारनेर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी राज्य मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व पारनेर तालुका पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष दत्ताजी उनवणे यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला .
