Type Here to Get Search Results !

राहुरी - निबोनीची झाडे जळाल्याच्या कारणावरुन राजेंद्र टिक्कल यांना बेदम मारहाण.


 


निबोनीची झाडे जळाल्याच्या कारणावरुन राजेंद्र टिक्कल यांना बेदम मारहाण.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


तुम्ही कापसाच्या पळाट्या आमच्या निबोनीच्या झाडाखाली टाकुन का पेटवल्या, त्यामुळे आमचे निबोनीची झाडे जळाले आहे. असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी राजेंद्र टिक्कल यांना लोखंडी पाईप, लाकडी काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली. 


राजेंद्र वेणुन्नाथ टिक्कल, वय ४८ वर्षे, रा. खटकाळी वस्ती, देवळाली प्रवरा, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, अदीनाथ सर्जेराव टिक्कल यांची शेती राजेंद्र टिक्कल यांच्या घराचे पाठीमागे असुन, ते बांधावरुन नेहमीच त्रास देतात. दि. ४ डिसेंबर २०२४ रोजी सांयकाळी ६.३० वाजेच्या सुमारास आरोपींनी त्यांच्या शेतातील कपाशीच्या पळाट्या गोळा करुन राजेंद्र टिक्कल यांच्या घराच्या पाठीमागे असणा-या बांधावरील दोन निंबोनीच्या झाडाखाली टाकल्या व कापसाच्या पळाट्या पेटवुन दिल्या. त्यामुळे निंबोणीची झाडे पेटली.


तेव्हा राजेंद्र टिक्कल आरोपींना म्हणाले की, तुम्ही कापसाच्या पळाट्या आमच्या निबोनीच्या झाडाखाली टाकुन का पेटवल्या आहे. त्यामुळे आमचे निबोनीची झाडे जळाले आहे. असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी राजेंद्र टिक्कल, त्यांची पत्नी व भावजय या तिघांना शिवीगाळ दमदाटी करुन लोखंडी पाईप, लाकडी काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच पुन्हा आमचे नादी लागलात तर तुमचा एक एकाचा काटाच काढु, अशी धमकी दिली. 


घटने नंतर राजेंद्र वेणुन्नाथ टिक्कल यांच्या फिर्यादीवरून आरोपी अदीनाथ सर्जेराव टिक्कल, विजय सर्जेराव टिक्कल, सुनिता आदिनाथ टिक्कल, अरुना सर्जेराव टिक्कल, सर्व रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, या चार जणांवर गुन्हा रजि. नं. १२६७/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ३ (५), ३२४ (४), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.