Type Here to Get Search Results !

पुणे: दिलीप वेडेपाटील फाऊंडेशन आयोजित भव्य पतंग महोत्सव पुणेकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने यशस्वी

 दिलीप वेडेपाटील फाऊंडेशन आयोजित भव्य पतंग महोत्सव पुणेकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने यशस्वी



पुणे: दिलीप वेडेपाटील फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य पतंग महोत्सवाने पुणेकर नागरिकांचे लक्ष वेधले असून, या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. भारतीय संस्कृतीचे जतन आणि परंपरांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने फाऊंडेशनने हा महोत्सव आयोजित केला होता.






फाऊंडेशनच्या वतीने श्री.शैलेश दिलीप वेडेपाटील यांनी या महोत्सवाचे उद्घाटन करताना सांगितले की, “पतंग महोत्सव हा फक्त एक कार्यक्रम नसून तो भारतीय परंपरेचा सन्मान आहे. अशा कार्यक्रमांद्वारे समाजात एकतेचा आणि आनंदाचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”


महोत्सवात विविध रंगी-बेरंगी पतंगांनी आकाश सजले, तर कुटुंबांसाठी मनोरंजनाचे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे विशेष आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक पतंग स्पर्धेने उपस्थित नागरिकांना आकर्षित केले आणि सर्व वयोगटातील लोकांनी उत्साहाने सहभाग घेतला.


कार्यक्रमाचा आनंद लुटताना पुणेकर नागरिकांनी दिलीप वेडेपाटील फाऊंडेशनचे मनःपूर्वक आभार मानले. "अशा उपक्रमांमुळे भारतीय संस्कृतीशी जोडले गेल्याचा आनंद होतो आणि संपूर्ण कुटुंबाला एकत्र येण्यासाठी एक सुंदर संधी मिळते," असे नागरिकांनी नमूद केले.


फाऊंडेशनच्या वतीने श्री. शैलेश दिलीप वेडेपाटील यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक एकता, परंपरा आणि आनंद यांचा संगम साधणारा हा कार्यक्रम यशस्वीपणे साजरा झाला. पुणेकरांनी या उपक्रमाचे कौतुक करत भविष्यातही असे कार्यक्रम होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

प्रथम क्रमांक -मसूद तांबोळी कोंढावा पुणे पतंग प्रकार भावडी

2 क्रमांक कु शिवम उमेश कुंभार - बावधन खुर्द

3 क्रमांक -भानू प्रताप सिंग - भावधान खुर्द




प्रतिनिधी अमोल उदमले सह हर्षल कोठावदे