Type Here to Get Search Results !

राहुरी - अण्णासाहेब चव्हाण यांना लाथा बूक्क्यांनी बेदम मारहाण

 अण्णासाहेब चव्हाण यांना बेदम मारहाण.



आमच्या शेतात पाणी का सोडतो, असे विचारल्याचा राग आल्याने मारहाण.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


तु आमच्या शेतात पाणी का सोडतो असे समजावुन सांगीतले असता दोघा जणांनी अण्णासाहेब चव्हाण यांना शिवीगाळ करुन खो-याच्या तुंबा व लाथा बूक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना राहुरी तालुक्यातील वळण येथे दि. २५ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली. 


अण्णासाहेब प्रल्हाद चव्हाण, वय ५५ वर्षे, रा. वळण, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, अण्णासाहेब चव्हाण यांची वळण शिवारात शेती असून त्यांच्या शेजारीच दत्तात्रय नानाभाऊ काळे यांची शेतजमीन आहे. तो चव्हाण यांना शेत जमीनीच्या बांधावरुन नेहमी त्रास देत असतो व त्याच्या शेतातुन चव्हाण यांच्या शेतात नेहमी पाणी येत असते. म्हणुन त्याला वेळोवेळी समजावुन सांगितले, पंरतु तरी तो नेहमी चव्हाण यांच्या शेतात पाणी सोडत असतो.


दि. २५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजेचे सुमारास अण्णासाहेब चव्हाण हे शेतात गेले असता त्यांच्या शेतात किशोर काळे याच्या शेतातुन पाणी आले होते. तेव्हा अण्णासाहेब चव्हाण त्याला म्हणाले की, तु आमच्या शेतात पाणी का सोडतो, असे समजावुन सांगत होते. तेव्हा आरोपींनी अण्णासाहेब चव्हाण यांना शिवीगाळ करुन खो-याचा तुंबा व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच तु जर आमच्या नादी लागला तर तुला जिवच मारुन टाकु, अशी धमकी दिली.


घटनेनंतर अण्णासाहेब प्रल्हाद चव्हाण यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी किशोर दत्तात्रय काळे व रामकिसन दत्तात्रय काळे, दोघे रा. वळण, ता. राहुरी. या दोघांवर गुन्हा रजि. नं. ५७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.