Type Here to Get Search Results !

राहुरी - नगर-मनमाड रोड ते महिपती महाराज चौक, (कोर्टरोड) चे काम सुरु करण्यासाठी निवेदन

 नगर-मनमाड रोड ते महिपती महाराज चौक, (कोर्टरोड) चे काम सुरु करण्यासाठी निवेदन.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी शहरातील नगर-मनमाड रोड ते महिपती महाराज चौक, (कोर्टरोड) चे काम सुरु करण्यात यावे. या मागणीसाठी आज दि. ३१ जानेवारी रोजी माजी नगरसेवक अक्षय तनपूरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 


राहुरी नगरपरिषदचे मुख्याधिकारी ज्ञानेश्‍वर ठोंबरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, राहुरी नगरपरिषद हद्दीतील नगर-मनमाड रोड ते महिपती महाराज चौक (कोर्ट रोड) चे काम नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले, मा. खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातुन टी. एस. करुन प्रशासकीय मान्यतेसाठी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठविला आहे.


तरी राहुरी नगरपरिषद प्रशासनाने लवकरात लवकर सदर कामाचा पाठपुरावा करुन प्रशासकीय मान्यता प्राप्त करुन कामाचे टेंडर काढून कामास सुरुवात करावी. असे निवेदनात म्हटले आहे. 


दिलेल्या निवेदनावर माजी नगरसेवक अक्षय तनपूरे, आनंद वाघ, किशोर भुजाडी, गणेश अळसुंदेकर, किशोर भागवत, जीशान शेख, सत्यवान पासवान, रितेश लांबे, नितीन इघे, योगश मुसळे, रोहित उंडे, महेश वराळे, प्रताप भांड, प्रशांत आव्हाड, दत्तात्रय भूजाडी आदिंच्या सह्या आहेत.