खैरेनगर (पाबळ) येथील श्रद्धा खैरे /चौधरी यांची MPSC मार्फत बहुजन कल्याण अधिकारी पदी निवड ...
खैरेनगर येथील श्रद्धा खैरे/चौधरी यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बहुजन कल्याण अधिकारी या राजपत्रित अधिकारी पदी राज्यात ओबीसी प्रवर्गात मुलींमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
श्रद्धा यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा खैरेनगर, माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल धामारी, येथे झाले. तसेच बारावी पर्यंतचे शिक्षण बारामती येथे शारदाबाई पवार विद्यालय व पाबळ येथे पूर्ण झाले. तसेच अवसरी येथील शासकीय महाविद्यालयात ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवी घेतली आहे.
2019 साली महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात तलाठी या पदावर निवड होऊन आत्ता मंडल अधिकारी या पदावर काम करत आहे . तिला या कामी तिचे वडील खैरेनगर चे माजी सरपंच एकनाथ खैरे व आई संगीता यांनी तसेच तिचे पती आय.टी. इंजिनियर वैभव चौधरी व सासू सासरे यांनी मोलाची साथ दिली.
तिला परीक्षेत मार्गदर्शन व यशस्वी होण्यासाठी पुणे येथील रयत प्रबोधिनी व संचालक उमेश कुदळे सर आणि तिचे दाजी व
सध्या केंद्रीय सुरक्षा पोलीस दलातील कमांडिंग ऑफिसर म्हणून कार्यरत असलेले अविनाश चौधरी व सध्या तहसीलदार म्हणून असलेले आदेश डफळ यांचे मार्गदर्शन मिळाले. तिच्या या यशामुळे तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

