पोपट पवार यांना दगडाने बेदम मारहाण.
आमच्या विरोधात केलेली केस मागे घे, असे म्हणुन शिवीगाळ व मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
आमच्या विरोधात पोलिस ठाण्यात दाखल केलेली केस मागे घे, असे म्हणुन आरोपींनी पोपट पवार यांना शिवीगाळ करुन दगडाने मारहाण केल्याची घटना दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुर येथे घडली.
पोपट कारभारी पवार, वय ५० वर्षे, रा. बारागाव नांदुर, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, सुमारे दोन वर्षीपर्वी पोपट पवार यांचा भाऊ सतिष पवार व त्याचे मुलांनी जागेचे कारणावरुन भांडण केले होते. तेव्हा पोपट पवार यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. तेव्हा पासुन आरोपींना त्याचा राग होता.
दि. २१ जानेवारी २०२५ रोजी बारागाव नांदुर गावची यात्रा असल्याने आरोपी तेथे आले होते. सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पोपट पवार हे घरासमोर उभा होते. तेव्हा आरोपी तेथे आले व म्हणाले कि, तु आमच्यावर केलेली केस माघे घे, असे म्हणुन शिवीगाळ करुन दगडाने मारहाण केली.
पोपट कारभारी पवार यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी सतिष कारभारी पवार, सिध्दार्थ सतिष पवार, आकाश सतिष पवार, सर्व रा. बारागाव नांदुर, ह. रा. राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजि. नं. ५३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), १२५, ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
