Type Here to Get Search Results !

पारनेर - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनकुटे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनकुटे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी 



आज 3 जानेवारी 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनकुटा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त प्रथम महिला सरपंच माननीय सुमनताई रांधवन यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात विद्यार्थिनींनी सावित्री बनवून आल्या होत्या. मुलींचे व मुलांचे सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय रघुनाथ केसकर, माननीय रामदास काळे,डाॅ नितिन रांधवन साहेब ,मा.चेअरमन ज्ञानेश्वर गागरे,भाऊसाहेब खामकर साहेब ,अनिल विधाते इत्यादी पाहुणे यावेळी उपस्थित होते काळे साहेबांनी बहुमोल मार्गदर्शन केले .सरपंच सुमनताई रांधवन,झावरे मॅडम ,कांबळे मॅडम, डुकरे मॅडम ,आस्मा भाभी यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचे स्वागत व मनोगत शाळेचे मुख्याध्यापक खामकर सर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार नवले सर यांनी मानले अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.