श्री ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, टाकळी ढोकेश्वर या विद्यालयात आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री. सुनील वाव्हळ व पर्यवेक्षक श्री. बाळासाहेब खिलारी आणि शिक्षक वृंद यांनी केले.
याप्रसंगी विद्यालयाचे मराठी विषय शिक्षक रवींद्र मते व अनेक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनाविषयी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अध्यक्ष निवड श्रीम. जाधव मॅडम यांनी केले. अनुमोदन श्रीम. गायखे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीम.नीलम खिलारी मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षक श्री. मल्हारी वाघस्कर, श्री. बाळासाहेब निवडुंगे, श्री. बाबासाहेब जाधव, श्री. अतुल सैद, श्री. नारायण शेळके, श्री. रवि ज्योतिक, श्री. महांडुळे, श्री. खत्रे सर, श्री. सुशांत खेडकर, श्रीम. वाळुंज मॅडम, श्रीम. प्रिया डव्हणे मॅडम, श्रीम. भोंडवे मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
