वॉरंटची बजावणी करून आरोपीस पोलिसांकडून अटक.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी येथील न्यायालयाने तालुक्यातील बारागाव नांदुर येथील इम्रान शेख याचे पोटगी मधील वाॅरंट काढल्याने राहुरी पोलिस पथकाने त्याला काल दि. २ जानेवारी रोजी पकडून गजाआड केले.
इम्रान गोरखा शेख, वय २९ वर्षे, रा. बारागाव नांदुर, ता. राहुरी, याचे राहुरी येथील न्यायालयाने पोटगी वॉरंट बजावले होते. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक समाधान फडोळ, पोलिस नाईक गणेश सानप, भगवान थोरात, सागर नवले आदि पोलिस पथकाने आरोपी इम्रान शेख याला २ जानेवारी २०२५ रोजी ताब्यात घेवुन न्यायालया समोर हजर केले.
न्यायालयाकडून प्राप्त झालेले पोटगी वॉरंट आपण वेळेत तोडून त्या बाबतची पावती पोलिसांना दाखवावी. अन्यथा अटकेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. असे आवाहन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले.
