नवनाथ खिलारी यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी शहरातील नवनाथ खिलारी यांचे आज दि. २१ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास वयाच्या ५५ व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राहुरी शहरातील गोकुळ कॉलनी येथील रहिवासी असलेले नवनाथ बाळाजी खिलारी वय ५५ वर्षे यांना शनिवार दि. १९ एप्रिल २०२५ रोजी हृदय विकाराचा तीव्र झटका आला होता. त्यावेळी त्यांना अहिल्यानगर येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
आज दि. २१ एप्रिल २०२५ रोजी नवनाथ खिलारी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी पहाटे एक वाजेच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
