Type Here to Get Search Results !

शीर्षक नाही

 आमच्या जागेत काटे टाकु नका, असे म्हणाल्याचा राग आल्याने तिघांना मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


तुम्ही आमच्या जागेत काटे टाकु नका, असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी नुतन नाईकवाडे यांच्यासह त्याचे पती व सासऱ्यांना शिवीगाळ करत लाकडी काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दि. १ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. 


नुतन महेंद्र नाईकवाडे, वय ३९ वर्षे, ह्या राहुरी तालुक्यातील तांदुळनेर येथे कुटुंबासह राहत असुन त्यांच्या घरा शेजारी आप्पासाहेब आबासाहेब नाईकवडे हा त्याचे कुटुंबासह राहण्यास आहे. तो नेहमी रस्त्याचे येणे जाण्याच्या कारणावरुन वाद घालीत असतो.


दि. १ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता नुतन नाईकवाडे ह्या त्यांच्या घरासमोर असताना आरोपी जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावरील काटे काढुन नुतन नाईकवाडे यांच्या जागेत लोटीत होते. तेव्हा नुतन नाईकवाडे यांचे पती महेंद्र व सासरे दशरथ त्यांना म्हणाले की, तुम्ही आमच्या जागेत काटे टाकु नका.


असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी नुतन नाईकवाडे, महेंद्र नाईकवाडे व दशरथ नाईकवाडे यांना शिवीगाळ करुन लाकडी काठी व लाथा बुक्याने मारहान केली. तसेच पुन्हा आमचे नादी लागलात तर तुम्हाला जिवे ठार मारुन टाकु, अशी जिवे मारण्याची धमकी दिली. झटापपटीत नुतन नाईकवाडे यांच्या गळ्यातील लाँग गंठन हे तुटुन गहाळ झाले, तसेच मोबाईल पडुन गहाळ झाले.


नुतन महेंद्र नाईकवाडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी आप्पासाहेब आबासाहेब नाईकवडे व बाबासाहेब शिवराम नाईकवाडे, दोघे रा. तांदुळनेर, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजि. नं. ७३७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३२४ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.