Type Here to Get Search Results !

राहुरी | जीवन गुलदगड यांची ओबीसी सेलच्या उत्तर जिल्हाध्यक्ष पदी निवड

 जीवन गुलदगड यांची ओबीसी सेलच्या उत्तर जिल्हाध्यक्ष पदी निवड.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अहिल्यानगर ओबीसी सेलच्या उत्तर जिल्हाध्यक्ष पदी राहुरी येथील जीवन रघुनाथ गुलदगड यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या हस्ते गुलदगड यांना निवडीचे पत्र देण्यात आले. 


या प्रसंगी जीवन गुलदगड म्हणाले, पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रातांध्यक्ष जयंत पाटील यांना अभिप्रेत असणारी पक्ष संघटना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधणीसाठी आपण प्रयत्नशिल राहू, पक्ष बळकटीसाठी व पक्ष मजबूत करण्यासाठी पक्षाची ध्येय, धोरणे समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी आपण कटिबध्द राहू असे त्यांनी सांगीतले.


यावेळी असिफ खलिफे, प्रकाश चव्हाण, सुनील गुलदगड, सलिम बागवान, भागवत झडे, महेश उदावंत, आनंद गुलदगड, प्रा. शिंदे, नारायण फुलसौंदर, संकेत दुधाडे, अमोल गुलदगड, सत्तार शेख, अमोल वाघचौरे, बबन गुलदगड, सतीश मेहेत्रे, आदी उपस्थित होते.