लोहार समाजाला आर्थिक विकास महामंडळचा लाभ मिळण्यासाठी तरुणांचा प्रयत्न.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
लोहार समाजाला ब्रह्मलीन आचार्य दिव्य आनंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करण्यासाठी लोहार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते, रामलिंग किसन कांबळे, गणेश भालके, दत्ताभाऊ कौसे, तसेच पत्रकार शिवाजी दवणे यांनी प्रयत्न करून ते समाजासाठी मिळून दिले.
त्यानंतर सद्यस्थितीत लोहार समाजाला मंजूर झालेले ब्रह्मलीन आचार्य दिव्य आनंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ अध्यापही कार्यान्वित झालेले नाही. ही बाब सर्व समाजासाठी चिंताजनक आहे. या महामंडळाच्या स्थापनेमुळे लोहार समाजातील युवकांना उद्योग वाढीसाठी चालना, युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास हातभार लागणार आहे.
या महामंडळाच्या कार्यप्रणालीत पारदर्शकता, गतिशीलता आणि स्थानिक सहभाग सुनिश्चित करावा. तसेच समाज बांधवांपर्यंत योजनांच्या प्रभावी लाभ पोहोचविण्यासाठी सदर महामंडळ कार्यान्वित झाल्यावर समाजासंबंधी क्षेत्रातील लोकांसाठी योजनेचा थेट लाभ पोहोचवावा, आर्थिक सामाजिक तांत्रिक मदतीसाठी एक समर्पित यंत्रणा, सरकारी धोरणांची परिणामकारक अंमलबजावणी, तसेच रोजगार निर्मिती आणि उद्योजकतेला चालना पोहोचण्यासाठी शासनाने त्वरित पावले उचलावीत.
यासाठी लोहार समाजाची सामाजिक कार्यकर्ते रामलिंग किसन कांबळे, सामाजिक कार्यकर्ते गणेश भालके, तसेच सोनई येथील सामाजिक कार्यकर्ते आपले लोहार समाजाचे हितचिंतक दत्ताभाऊ कौसे, तसेच पत्रकार शिवाजी दवणे यांनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदनाद्वारे कळविले आहे.
तरीही त्यांनी आपल्या समाजाला मिळालेल्या आर्थिक विकास महामंडळाचा लवकरात लवकर कार्यान्वित होईलच आणि त्याचा लाभही समाजाला मिळवून देण्याची हमी त्यांनी दिली. तसेच सामाजिक कार्यकर्ते रामलिंग किसन कांबळे, गणेश भालके, दत्ताभाऊ कौसे, तसेच पत्रकार शिवाजी दवणे हे समाजासाठी खूप चांगलं काम करत आहेत याबद्दल समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.