Type Here to Get Search Results !

राहुरी - ग्रामीण भागातील खेळाडू चमकत आहेत प्रज्ञा गडाख हिच्यासह राहुरी फॅक्टरी येथील खेळाडूंची कामगिरी परिसराचा नावलौकिक करणारी ....शिवाजीराव कपाळे

 ग्रामीण भागातील खेळाडू चमकत आहेत प्रज्ञा गडाख हिच्यासह राहुरी फॅक्टरी येथील खेळाडूंची कामगिरी परिसराचा नावलौकिक करणारी ....शिवाजीराव कपाळे



राहुरी 

   ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये आपल्या क्षेत्रामध्ये नाव लौकिक करण्याची धमक आहे हे अनेक खेळाडूंनी दाखवून दिले आहे राहुरी फॅक्टरी येथील खेळाडू प्रज्ञा गडाख हिनेदेखील ही चमक दाखवून देत महाराष्ट्राच्या हॉलीबॉल संघाचे नेतृत्व करत देश पातळीवरचा उत्कृष्ट खेळाडू हा नावलौकिक मिळवला आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांनी केले आहे.

याबाबत माहिती अशी की,दिल्ली गजियाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील शूटिंग हॉलिबॉल स्पर्धेत राहुरी फॅक्टरी येथील राहुरी येथील रामदास पाटील धुमाळ न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ची विद्यार्थिनी  प्रज्ञा गडाख,तनिष्का गवळी,श्वेताली गोपाळे,आदीं नी महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळवून गाजियाबाद दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवाला या पासिंग हॉलीबॉल संघाला विजेतेपद मिळाले आहे प्रज्ञा गडाख ही या संघाची नेतृत्व करणारी राहुरी फॅक्टरी येथील सुकन्या आहे म्हणून तिच्यासह तीनही खेळाडूंचा साई आदर्श मल्टीस्टेट च्या वतीने सन्मान करण्यात आला 


यावेळी बोलताना साई आदर्श मल्टिस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे म्हणाले की,साई आदर्श परिवार नेहमीच खेळाडूंचा पाठीशी उभा राहिला आहे.ग्रामीण भागातील खेळाडू यश मिळवत आहे याचा आम्हाला अभिमान आहे.भविष्यातही संस्थेच्या वतीने अशा होतकरू खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन देण्यात येईल.


यावेळी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळसे,डॉ.तनपुरे कारखान्याचे संचालक अशोक उऱ्हे,विष्णुपंत गीते,किशोर थोरात, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, दत्तात्रय गोपाळे, मॅनेजर सचिन खडके व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी विक्रम जाधव,गोपीनाथ हारगुडे, अशोक औटी,प्रसाद गाडे,याकूब शेख,गोपिनाथ सूर्यवंशी, स्वप्नील शेलार,स्वाती देशमुख,पूजा निघूते,राणी पवळे, रुपाली गाडेकर, मुक्ता औटी, अर्षद शेख,अन्सार शेख,विशाल चव्हाण, शांताराम भुजबळ,विजय डुकरे आदींसह साई आदर्श मल्टिस्टेटचे कर्मचारी उपस्थित होते.