Type Here to Get Search Results !

राहुरी - गणेश रामदास तमनर याचे राज्य सेवा परीक्षेत घवघवीत यश

 गणेश रामदास तमनर याचे राज्य सेवा परीक्षेत घवघवीत यश.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


ग्रामीण भागतील बरेच युवक अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहत MPSC/UPSC च्या अभ्यासात स्वत:ला झोकून देतात पण सर्वांनाच त्वरित यश मिळत नाही. त्यामुळे बरेचजण मागे फिरतात किंवा अन्य मार्ग निवडून स्थिरावतात. पण जे जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर लढत राहतात, त्यांचा एक दिवस नक्की उगवतोच. अशीच उल्लेखनीय व अभिमामास्पद कामगिरी केलीय राहुरी तालुक्यातील बाभुळगाव येथील गणेश रामदास तमनर या शेतक-याच्या पुत्राने.


नुकत्याच झालेल्या राज्य सेवा परीक्षेत यश मिळवून गणेशने आपले Class one अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. बाभुळगाव सारख्या ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेला गणेश आई वडिलांच्या कष्टाचे पांग फेडण्यासाठी ध्येयाने झपाटला गेला. कोणतीही उच्च शैक्षणिक कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना केवळ प्रथमवर्ग  अधिकारी होण्यासाठी अपार मेहनत करुन गणेशने  मिळवलेले हे यश अभिनंदनीय ठरत आहे.


इथपर्यंतचा गणेशचा प्रवास अत्यंत खडतर व कठीण होता. आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवून गणेशने या परीक्षांचा अभ्यास केला. यात यशाने त्याला हुलकावणी दिली, पण निराश होऊन प्रथम वर्ग अधिकारी व्हायचं, या ध्येयापासून गणेश तसूभरही मागे हटला नाही. प्रबळ इच्छाशक्ती पुढे यश लोटांगण घालते याचा प्रत्यय दिसून आला.


गणेशच्या यशाने बाभुळगाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. समस्त गावकरी व मित्र परिवार यांनी त्याचे व कुटुंबाचे अभिनंदन केले. बाभुळगावचा बिरुदेव ढोणे म्हणूनच गणेशचे सर्वत्र कौतुक होत आहे.