संतोष येळे यांना मागील भांडणाच्या कारणावरुन कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण.
राहुरी प्रतिनिधी,
मागील भांडणाच्या कारणावरुन आरोपींनी संतोष येळे यांना शिवीगाळ करुन कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना राहुरी तालुक्यातील वडनेर येथे दि. २९ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या दरम्यान घडली.
संतोष तुकाराम येळे, वय ३४ वर्ष, रा. वडनेर, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बाळासाहेब गिरीजा येळे हा त्याचे कुटुंबासहीत संतोष येळे यांच्या घरापासुन जवळच थोडे अंतरावर रहावयास आहे. दोघात वाद झाल्याने त्यांचा वाद कोर्टात वाद चालु आहे.
दि. २९ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास संतोष येळे हे वडनेर गावातील दुध संकलन केंद्रावर दुध घालुन घरी जात होते. तेव्हा रस्त्यात त्यांच्या ओळखीचे किशोर वडीतके यांनी त्यांना थांबवुन गाय छाप मागीतली.
तेव्हा आरोपी तेथे आले. व मागील केसचे काणावरुन संतोष येळे यांना पाहुन शिवीगाळ करु लागले. त्यावेळी संतोष येळे त्यांना म्हणाले की, तुम्ही मला शिवीगाळ करु नका. असे म्हणाल्याचा त्यांना राग आल्याने त्यांनी संतोष येळे यांना शिवीगाळ दमदाटी करत आता तुझ्याकडे पाहतो असे म्हणुन लाथा बुक्क्यांनी मारहान केली.
तसेच तु आमच्या रसत्याने कसा काय आलास असे म्हणुन कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून जखमी केले. तसेच पुन्हा तु या रस्त्याने आलास तर तुला जिवे ठार मारुन टाकु अशी धमकी दिली.
संतोष तुकाराम येळे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी बाळासाहेब गिरीजा येळे, रामा बाळासाहेब येळे, किशोर वडीतके, तिघे रा. वडनेर, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजि. नं. ११६६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
