Type Here to Get Search Results !

राहुरी - अक्षय कर्डिलेंसाठी राहुरीत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन.



 


अक्षय कर्डिलेंसाठी राहुरीत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी, नगर, पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर अहिल्यानगर येथे झालेल्या शोक सभेमध्ये जिल्ह्यातील बहुतांशी नेत्यांनी युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा निर्धार केला आहे. आगामी होणा-या पोटनिवडणुकी पूर्वीच कार्यकर्त्यांच्या विचार जाणून घेण्यासाठी बुधवार दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता राहुरी शहरातील पांडुरंग कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीचा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 


पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील, अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप आदि मान्यवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.


पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कर्डिले कुटुंबीयांचे पालकत्व स्वीकारले असून अक्षय कर्डिले यांना आमदार बनविण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. त्याचबरोबर नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.