Type Here to Get Search Results !

राहुरी - विवाहित तरुण बेपत्ता, आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन.

विवाहित तरुणी बेपत्ता, आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी पोलीस ठाणे हद्दीतून एक विवाहित तरुणी सुमारे १५ दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली असून सदर तरुणी कोठे आढळून आल्यास राहुरी पोलिस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले. 


सविता महेंद्र कोळसे, वय २९ वर्षे, रा. टाकळीमियाँ, ता. राहुरी, ही विवाहित तरुणी दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजे दरम्यान कोणास काही एक न सांगता राहते घरातुन निघुन गेली आहे. नातेवाईकांनी तिचा आजु बाजुला, नातेवाईकांकडे शोध घेतला. परंतु ती मिळुन आली नाही.


महेंद्र देविदास कोळसे, वय ३५ वर्षे, धंदा- मजुरी, रा. टाकळीमियाँ, ता. राहुरी, यांनी दिलेल्या तक्रारीवरून राहुरी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात हवालदार हनुमंत आव्हाड हे पुढील तपास करीत आहे. 


बेपत्ता झालेल्या विवाहित तरुणीचे वर्णन- रंग- सावळा, उंची- ५ फुट ५ इंच, चेहरा- उभट, केस- काळे मोठे, नाक- सरळ, अंगात पिवळ्या रंगाची त्यावर लाल व पांढरे रंगाचे पट्टे असलेली सहावारी साडी, पायात चप्पल.


असे वर्णन असलेली तरुणी कोठे आढळून आल्यास राहुरी पोलिस ठाण्यात अथवा महेंद्र कोळसे- मो. नं. - 9322285908, हवालदार हनुमंत आव्हाड- 9359329831 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधन्याचे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले.