संजय इघे सर यांची मुख्याध्यापक पदी निवड.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
डॉ. बा. बा. तनपुरे स. सा. का. श्री शिवाजीनगर यांच्या माध्यमातून चालविले जाणारे श्री लक्ष्मीनारायण प्रतिष्ठान या संस्थेचे श्री नारायणगिरी महाराज विद्यालय मल्हारवाडी या विद्यालयाचे जेष्ठ व आदर्श शिक्षक श्री संजय इघे सर यांची मुख्याध्यापक पदी निवड करण्यात आली.
श्री इघे सर यांनी गेली तीस वर्ष संस्थेच्या विविध विद्यालयात अतिशय प्रामाणिकपणे अध्यापनाचे, ज्ञानदानाचे काम केले, तसेच अनेक आदर्श, गुणवान व संस्कारी विद्यार्थी घडविले.
त्यांच्या चांगल्या व आदर्श कामाची दखल घेऊनच संस्थेने त्यांची नेमणूक मुख्याध्यापक पदी केली आहे. त्यांचे संस्थेचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
