आदिनाथ निशाणे यांना दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
आपला पुर्वीचा वाद मिटलेला आहे, आता मला शिवीगाळ करु नका, असे म्हणाल्याचा राग आल्याने आरोपींनी आदिनाथ निशाणे यांना काठी व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना दि. ३१ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या दरम्यान घडली.
आदिनाथ गिताराम निशाणे, वय ३३ वर्षे, धंदा- शेती रा. खुडसरगाव, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आदिनाथ निशाणे हे दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घराच्या समोर बसलेले होते.
तेव्हा त्या ठिकाणी आरोपी आले व आदिनाथ निशाने यांना शिवीगाळ करु लागले. तेव्हा निशाणे त्यांना म्हणाले कि, तुम्ही विनाकारण शिवीगाळ करु नका, आपला पुर्वीचा वाद मिटलेला आहे. आता मला शिवीगाळ करु नका, असे म्हणाल्याचा आरोपींना राग आला. त्यांनी निशाणे यांना काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
आदिनाथ गिताराम निशाणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी शिवाजी बाबासाहेब चव्हाण, लखन बाबासाहेब चव्हाण, किशोर मोहन चव्हाण, धर्मा रखमाजी चव्हाण, रामेश्वर विठ्ठल चव्हाण, प्रविण धर्माजी चव्हाण, सर्व रा. खुडसरगाव, ता. राहुरी, या सहा जणांवर गुन्हा रजि. नं. ११६९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), १८९ (२), १९१ (१), १९०, ११५ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
