वंदे मातरम गिताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
वंदेमातरम गिताच्या १५० व्या वर्धापन दिना निमित्त ७ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी साडेनऊ ते साडेेदहा या वेळेत राहुरीच्या रामदास पाटील धुमाळ कला, शास्र, वाणिज्य महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली.
वंदे मातरम गितास १५० वर्ष पुर्ण होत असल्याने राज्यातील सर्व शासकीय, खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कौशल्य विद्यापीठ व कौशल्य विकास केंद्रामध्ये वंदे मातरम गीत गायन, देशभक्तीपर भाषणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन, सांस्कृतिक कार्यक्रम या सारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राज्य स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या धर्तीवर राज्यातील जिल्हा व तालुका स्तरीय समिती स्थापन करून हा कार्यक्रम यशस्वी केला जाणार आहे.
७ नोव्हेंबर रोजी राहुरी महाविद्यालयात होणा-या वंदे मातरम सार्ध शताब्धी वर्षा निमित्त सकाळी साडेनऊ ते नऊ पंचेचाळीस या वेळेत उद्घाटन, प्रस्तावना व मान्यवरांचा सत्कार, नऊ पंचेचाळीस ते दहा या वेळेत लघुनाटिका सादरीकरण, दहा ते सव्वा दहा अध्यक्षीय भाषण, सव्वा दहा ते साडेदहा मुख्य वक्त्याचे भाषण, साडेदहा ते दहा पस्तीस वंदे मातरम समूह गायन, दहा पस्तीस ते दहा चाळीस या वेळेत आभार व समारोप होणार आहे.
३ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत शासनाच्या आदेशानुसार नियुक्त करण्यात आलेले तालुका स्तरीय समितीचे सदस्य तहसीलदार नामदेव पाटील, नायब तहसीलदार संध्या दळवी, गटशिक्षण अधिकारी तुंभारे, पञकार राजेंद्र वाडेकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी श्रीहरी वैद्य, राहुरी महाविद्यालय प्राचार्य अनिता वेताळ, औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्राचार्य मुकुंद महामुनी, साहित्यिक चंद्रकांत भोसले, मिलिंद आडसुरे उपस्थित होते.
