कोर्टातील केस मागे घे, असे म्हणून शिवाजी चव्हाण यांना मारहाण.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
तु कोर्टातली केस मागे घे, तु जर केस मागे घेतली नाहीस तर आम्ही तुला, तुझ्या जावयाला व मुलीला जिवच मारून टाकु अशी धमकी देवुन आरोपींनी शिवाजी चव्हाण यांना लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील माहेगाव येथे दि. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली.
शिवाजी बाबासाहेब चव्हाण, वय ४१ वर्षे, धंदा शेती, रा. माहेगाव, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास शिवाजी चव्हाण हे घराच्या समोर बसलेले असताना त्या ठिकाणी आरोपी आले आणि शिवीगाळ करु लागले.
तेव्हा शिवाजी चव्हाण त्यांना म्हणाले कि, तुम्ही विनाकारण शिवीगाळ करु नका, आपला आता पुर्वीचा वाद कोर्टात चालु आहे, आता मला शिवीगाळ करु नका. असे म्हणाल्याचा राग आल्याने ते म्हणाले कि, तु कोर्टातली केस मागे घे, तु जर केस मागे घेतली नाहीस तर आम्ही तुला, तुझ्या जावयाला व मुलीला जिवच मारून टाकु, अशी धमकी दिली. तसेच लाकडी दांडा व लाथा बूक्क्यांनी मारहाण केली.
शिवाजी बाबासाहेब चव्हाण यांच्या फिर्यादीवरून आरोपी अदिनाथ गिताराम निशाने, जयराम गणपत निशाने, साईराम गणपत निशाने, तीघे रा. खुडसरगाव, गणेश आप्पासाहेब जाधव, रा. पाथरे खुर्द, तसेच चांगदेव रखमाजी चव्हाण, कार्तिक चांगदेव चव्हाण, शांताबाई चांगदेव चव्हाण, सिध्देश्वर चांगदेव चव्हाण, निलेश जाधव, रा. माहेगाव, ता. राहुरी, या ९ जणांवर गुन्हा रजि. नं. ११७०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), १८९ (२), १९०, १९१ (२), ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
