Type Here to Get Search Results !

राहुरी - शिक्षक संघटनेचा विकास आघाडीला पाठिंबा

 शिक्षक संघटनेचा विकास आघाडीला पाठिंबा.



शिक्षक बंधुनी विकास आघाडीच्या सर्व उमेदवांराना निवडून द्यावे- मा. खा. प्रसादराव तनपुरे.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


नगरपरिषदेत उमेदवार देताना सर्व समाजातील घटकांना आपण न्याय दिला असुन नगराध्यक्ष पदाचा मान यावेळी शिक्षकाला मिळणार आहे. त्यामुळे भविष्यातील योजना राबविण्यासाठी अध्यक्ष हा सुशिक्षित असावा. त्यामुळे शिक्षक बंधुनी प्रभागातील सर्व विकास आघाडीच्या उमेदवांराना निवडून द्यावे, असे आवाहन मा. खासदार प्रसादराव तनपुरे यांनी केले.


शहरात राहणाऱ्या सर्व शिक्षण संस्था मधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना केले. आजवर आपण कुठल्याही योजना राबवताना भविष्यात येणाऱ्या अडचणीचा विचार करुन केल्या आहेत. आपली पालिका ही नागरीकांना वर्ष भर शुद्ध पाणी पुरवठा करणारी एकमेव पालिका आहे. आपला घनकचरा प्रकल्प महाराष्ट्रासाठी आदर्श ठरत आहे. ज्यातुन पालिकेला उत्पन्न मिळते.


शहर सुशोभिकरण जाॕगिग पार्क शहराची प्रवेशव्दारे वेस्टेज पाण्याचे शुध्दीकरण पथदिवे अशी आदर्श वत विकासाची कामे केली आहे. आतापर्यत सर्व समाज बांधवाना अध्यक्ष  पदाची संधी दिली आहे. त्यामुळे शिक्षक बांधवानी आपले शहर आपला स्वाभिमान याचा विचार करुन विकास आघाडीच्या उमेदवाराना निवडुन द्यावे असे आवाहन मा. खा. प्रसाद तनपुरे यांनी केले.


यावेळी बाजार समितीचे सभापती शिवाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरुण तनपुरे, शिक्षक सोसायटीचे अप्पासाहेब शिंदे, किशोर जाधवसर, डि. आर. पानसंबळसर, डाॕ. जयंत कुलकर्णी, डाॕ. पैठणे, गुलदगड सर, सोसायटी संचालक संभाजी गाडे सर, नालकर सर, संचालक भारत वारुळे सर, सर्व शिक्षण संस्था मधील शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. शिवचिदंबर मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी माजी मुख्याध्यापक गुलदगड सर होते.