Type Here to Get Search Results !

राहुरी - मायलेकांना शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण.


 



मायलेकांना शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


सुनेला फक्त तुझेच कपडे घे म्हणाल्याचा राग आल्याने मायलेकांना दोघांनी शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे घडली आहे.


सुरेखा रभाजी भोसले रा. कोल्हार खुर्द ता. राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, त्यांच्या मुलाचे सुमारे दोन वर्षापुर्वी दुर्गा उर्फ शितल हिचेशी लग्न झाले होते, ती दोन महिने नांदली. त्यानंतर त्यांची सुन कधी माहेरी तर कधी सासरी राहत असत. तसेच तीला एक वर्षाची मुलगी आहे. 


दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी त्यांची सुन दुर्गा उर्फ शितल स्वप्निल भोसले व रुपेश सुभाष वाघमारे असे दोघे त्यांच्या घरी आले. त्यावेळी त्यांनी सुरेखा भोसले यांनी घराचे कुलूप उघडण्यास सांगीतले असता त्यांनी त्यांना घराचे कुलूप उघडुन दिले. सून दुर्गा ही तिचे कपडे घेत असताना तु तुझेच कपडे घे बाकीचे काही घेऊ नको.


असे म्हणाल्याचा सुनेला राग आल्याने ती सुरेखा भोसले यांना शिवीगाळ करू लागली. त्यावेळी मुलगा स्वप्निल याने शिवीगाळ का करते, असे विचारले असता रुपेश वाघमारे याने त्याच्या हातातील लोंखडी रॉडने स्वप्नीलच्या डोक्यात, पोटावर, हातावर व पायावर मारहाण केली. 


तर सुन दुर्गा भोसले हिने ढकलुन दिले व दोघांनी मिळून दोघा मायलेकांना लाथाबुक्यानी मारहाण केली व तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी देऊन त्याठिकाणाहुन ते दोघे निघुन गेले. त्यानंतर त्याठिकाणी नातेवाईक जमा झाले त्यांनी स्वप्नील यास अ‍ॅम्ब्युलन्सने राहुरी पोलीस ठाण्यात  अदोगर नेऊन नतंर राहुरीच्या ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.


सुरेखा रभाजी भोसले रा. कोल्हार खुर्द ता. राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दुर्गा उर्फ शितल स्वप्निल भोसले व रुपेश सुभाष वाघमारे दोन्ही रा. सावेडी अहिल्यानगर यांच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गु.र.न. १३२१ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ११८ (१), ३५१ (२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.