Type Here to Get Search Results !

राहुरी - तु माझ्या विषयी पाठीमागे का बोलतो, असे म्हणुन विशाल थोरात याला मारहाण

 तु माझ्या विषयी पाठीमागे का बोलतो, असे म्हणुन विशाल थोरात याला मारहाण.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


तु माझ्या विषयी पाठीमागे का बोलतो, असे म्हणुन आरोपींनी विशाल थोरात या तरुणाला शिवीगाळ करत लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. तसेच कत्तीने मारुन जखमी केल्याची घटना दि. १७ जानेवारी रोजी दुपारच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे घडली. 


विशाल नंदु थोरात, वय २० वर्षे, हा तरुण राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील रहिवाशी आहे. निखील बाळु जाधव हा ब्राम्हणी येथे कुटुंबासह राहवयास आहे. दोघांची चांगली ओळख आहे. दि. १७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.३० वाजे दरम्यान विशाल थोरात हा मोटारसायकलवर घरी जात असताना निखील जाधव याने विशाल याला थांबवीले. 


त्यावेळी तो म्हणाला की, तु माझ्या विषयी पाठीमागे का बोलतो, तेव्हा विशाल त्याला म्हणाला की, मी तुझ्या विषयी पाठीमागे काहीही बोलत नाही. त्यावेळी आरपींनी विशाल याला शिवीगाळ करत लाथा बूक्क्यांनी मारहाण केली. कत्तीने मारुन जखमी केले. तसेच तु आमच्या नादी लागु नको, नाहीतर तुला जिवे ठार मारुन टाकु, अशी धमकी दिली.


विशाल नंदु थोरात याच्या फिर्यादीवरून आरोपी निखील बाळु जाधव, अजय बाळु सुर्यवंशी, राहुल कैलास बर्डे, सोन्या सुर्यवंशी, सर्व रा. ब्राम्हणी, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजि. नं. ५१/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.