माहेरहून ६ लाख रुपए आणावेत म्हणून विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
जमीन खरेदी करण्यासाठी आई वडिलांकडुन ६ लाख रुपए आणावेत या कारणाकरिता विवाहित तरुणीला शिवीगाळ दमदाटी करुन लाथा बुक्क्याने मारहाण केली. तसेच उपाशी पोटी ठेवुन मानसिक व शारिरिक छळ केला. या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
आरती सतीश तरकसे, वय २६ वर्षे, धंदा घरकाम, रा. तरकसवाडी, अस्तगाव, ता. राहाता, हल्ली रा. आरडगाव, ता. राहुरी, या विवाहित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, आरती तरकसे हिचा विवाह दि. २२ नोव्हेंबर २०२४ रोजी सतीश इंद्रभान तरकसे याच्याशी झाला होता. लग्न झाल्यानंतर सासरच्या लोकांनी सुरुवातीचे तीन महिने आरती हिला व्यवस्थित नांदवले.
त्यानंतर आपल्याला जमीन घ्यायची आहे, त्याकरिता तु तुझ्या आई वडिलाकडुन ६ लाख रुपए घेवुन ये. असे म्हणू लागले. तेव्हा आरती हिने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा सासरच्या लोकांनी आरती हिला शिवीगाळ दमदाटी करुन लाथा बुक्क्याने मारहाण केली. तसेच उपाशी पोटी ठेवुन मानसिक व शारिरिक छळ केला.
सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून आरती सतीश तरकसे या विवाहित तरुणीने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्या फिर्यादीवरून आरोपी पती- सतीश इंद्रभान तरकसे, सासरा- इंद्रभान नाना तरकसे, सासू- मंदा इंद्रभान तरकसे, भाया- नितीन इंद्रभान तरकसे, भावजई- सोनाली नितीन तरकसे, सर्व रा. तरकसवाडी, अस्तगाव, ता. राहाता, यांच्यावर गुन्हा रजि. नं. ५०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ८५, ११५ (२), ३५१ (२), ३५२, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
