Type Here to Get Search Results !

राहुरी - मोकळ्या जागेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला क्रीडा संस्कृतिक भवन निर्माण करावे- राष्ट्रीय कामगार संघटना

 मोकळ्या जागेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला क्रीडा संस्कृतिक भवन निर्माण करावे- राष्ट्रीय कामगार संघटना.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


राहुरी शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला क्रीडा संस्कृतिक भवन निर्माण करावे. या मागणीसाठी राहुरी येथील राष्ट्रीय कामगार संघटनेच्या वतीने महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले. 


दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, आंतरराष्ट्रीय पातळीवर व देश पातळीवर तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान आहे. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. त्यांची लेखनी आजही समाजाला प्रेरणादायी आहे. त्यांच्या साहित्यातून अनेक कलाकृती तसेच चित्रपट तसेच सांस्कृतिक महाराष्ट्राला वेगळी ओळख करून देणारी त्यांची लेखणी आजही नवीन पिढीला सर्वसामावेशक बहुजन समाजाला प्रेरणादायी आहे.


अशा महामानव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आपल्या राहुरी शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला क्रीडा संस्कृतिक भवन निर्माण करावे. राहुरी तालुक्यातील तसेच महाराष्ट्रातील जनतेला या कला भवनामध्ये विविध प्रकारचे नाटके वैचारिक व्याख्याने तसेच इतर आपली कला सादर करण्यासाठी एक हक्काचे स्थान निर्माण होईल आणि महाराष्ट्राला एक सांस्कृतिक नव्या उंचीवर घेऊन जाता येईल.


यासाठी राहुरी शहरात सांस्कृतिक भावनांची निर्मिती उभारणी करण्यात यावी. अशी आमची प्रमुख मागणी आहे. तसेच या सांस्कृतीक भवनासाठी जागा उपलब्ध आहे. हे आपल्या निदर्शनात आणून देत आहोत. तरी संबंधित राहुरी येथील तहसीलदार तथा दंडाधिकारी यांना निवेदन देऊन भूमपान क्रमांक उपविभाग ४२२ ऑब्लिक ब या ठिकाणी जागा उपलब्ध आहे. ही जागा तात्काळ उपलब्ध करून द्यावी. अशी आमची प्रमुख मागणी आहे.


निवेदन देते वेळी राष्ट्रीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुकुंद भाऊसाहेब जगधने, पत्रकार दीपक साळवे, अतुल वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते बाबा साठे आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.