Type Here to Get Search Results !

राहुरी - रमेश शिंदे यांना बेदम मारहाण, तिन जणांवर गुन्हा दाखल

 रमेश शिंदे यांना बेदम मारहाण, तिन जणांवर गुन्हा दाखल.



राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


आरोपी हे रमेश शिंदे यांच्या घरात घुसले आणि त्यांना घरातून बाहेर ओढत आणून शिवीगाळ करत लाकडी फळी व गजाने मारहाण केली. ही घटना राहुरी तालुक्यातील गंगापुर येथे दि. ८ जानेवारी रोजी दुपारच्या दरम्यान घडली. 


रमेश पारजी शिंदे, वय ६५ वर्षे, रा. गंगापुर, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, रमेश शिंदे यांची गंगापुर गावत शेती आहे. त्यांच्या शेती शेजारीच त्यांचा पुतण्या राहुल शिंदे याची शेती आहे. दोघांत शेताचे बांधावरुन वाद आहेत.


दि. ८ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास आरोपी रमेश शिंदे यांच्या घरात आले व घाणघाण शिवीगाळ करुन रमेश शिंदे यांना घराचे बाहेर ओढुन आणले. त्यानंतर लाकडी फळी व गजाने बेदम मारहाण केली. आणि आमचे नादी पुन्हा लागला किंवा आमचे विरुध्द तक्रार दिली तर जिवे ठार मारुन टाकीन, अशी धमकी देऊन त्यांच्या खिशातील १ हजार ६०० रुपये रोख रक्कम काढुन घेतली. 


या घटनेत रमेश पारजी शिंदे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर श्रीरामपुर येथील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी राहुल दत्तात्रय शिंदे, वच्छला दत्तात्रय शिंदे, पुजा राहुल शिंदे, तिघे रा. गंगापूर, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजि. नं. ३५/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११९ (१), ३ (५), ३३३, ३५१ (२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.