Type Here to Get Search Results !

संगमनेर - संगमनेर शहरामध्ये कत्तलखान्यावर पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे 11 आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करुन 11,06,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल




क्रमांक: पीआरओ/प्रेसनोट/46/2026 प्रेस नोट दिनांक :- 10/02/2026

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संगमनेर शहरामध्ये कत्तलखान्यावर पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, गोवंशीय जनावरांची  कत्तल करणारे 11 आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करुन  11,06,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल 

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मा. श्री सोमनाथ घार्गे साहेब, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे ठिकाणांची व गोवंशीय जनावरांची कत्तल करुन गोमांस विक्री करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत.


सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार  गणेश लोंढे, विजय पवार, दिपक घाटकर, सुयोग सुपेकर, अमृत आढाव, चालक महादेव भांड यांचे पथक तयार करुन सदर पथकास संगमनेर शहरामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले. 


वर नमुद पथक दिनांक 10/02/2026 रोजी पहाटे संगमनेर शहर परिसरामध्ये कत्तलखान्याची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत राजवाडा, बुध्दविहार समोर, मोगलपुरा संगमनेर  येथे अतिक उर्फ सोनु रफिक कुरेशी रा.मोगलपुरा संगमनेर व सलिम रियाज कुरेशी रा. मदिनानगर संगमनेर यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशी जनावरांचे कत्तल करण्यास मनाई असतांना गोवंशी जातीचे जिवंत जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने आणुन त्यांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली. पथकाने तात्काळ बातमीतील ठिकाणी जावुन खात्री केली असता काही इसम गोवंशीय जनावरांची कत्तल केलेले गोमास टेम्पोमध्ये भरतांना दिसुन आले. पथक सदर इसमांना पकडण्यासाठी जात असतांना काही इसम पत्र्याचे शेडचे पाठीमागील दरवाजाने अंधारातुन पळुन गेले. सदर इसमांचा पाठलाग करता खोलीमध्ये काही इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करत असतांना दिसुन आले. तेव्हा त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नांव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नांवे 1) फैज अशपाक कुरेशी वय - 22 वर्षे रा. गल्ली नं.02 मदिनानगर  संगमनेर, 2) सद्दम मोहमद जावेद कुरेशी वय- 29 वर्षे रा. मोगलपुरा, जुना राजवाडा, संगमनेर, 3) कलिम सलीम सय्यद वय - 36 वर्षे रा. मोगलपुरा, जुना राजवाडा संगमनेर, 4) मुलमफरिद जावेद कुरेशी वय -32 वर्षे रा. मोगलपुरा जुना राजवाडा संगमनेर, 5) अनस गुलामसरवर कुरेशी वय-21 वर्षे रा. अलकानगर संगमनेर, 6) फैसल जाकिर कुरेशी वय- 20 वर्षे रा. गल्ली नं.1 मदिनानगर संगमनेर , 7) जुनेद आयाज कुरेशी रा. मदिनानगर संगमनेर,  असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे पळुन गेलेल्या इसमांबाबत विचारपुस करता त्याने पळुन गेलेल्या इसमांची नावे 8) अतिक उर्फ सोनु रफिक कुरेशी रा. मोगलपुरा संगमनेर (फरार), 9) सलिम रियाज कुरेशी रा. मदिनानगर संगमनेर (फरार), 10) हाशमी उर्फ बुड्डी नासिर कुरेशी रा. मदिनानगर संगमनरे 11) टाटा टेम्पो क्र.एच.एच.14 सी.डी.0839 चे मालक (माहिती नाही) (फरार)असे असल्याचे सांगितले. 

वरील इसमांविरुध्द कारवाई करुन सदर ठिकाणावरुन 5,40,000/- रुपये किमतीचे 1800 किलो गोमांस, 5,50,000/- रुपये कि.चा टाटा कंपनीचा टेम्पो, 12,000/- रु कि.चा एक रिक्षा, 1000/- रुपये किमतीचा इलेक्ट्रीक वजनकाटा व 3000/- रुपये किमतीचे 01 लोखंडी कु-हाड, दोन चाकु, एक काणस असा एकुण 11,06,00/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

आरोपीविरुध्द संगमनेर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 136/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 271, 325, 3 (5) सह महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे  कलम 5, (ब), 5 (क), 9, 9 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे. 

सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.