हेल्मेट न वापरणारे मोटारसायकल स्वारावर कारवाई करणार.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
प्राणांतिक अपघात रोखण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांच्या सुचनेनुसार अहिल्यानगर जिल्ह्यात तसेच राहुरी पोलीस ठाणे हद्दीत हेल्मेट न वापरणारे मोटारसायकल स्वारावर कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक मोटरसायकल स्वाराने हेल्मेट वापरावे असे आवाहन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले.
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत सन २०२४ मध्ये ५७ सन २०२५ मध्ये ५८ प्राणांतिक अपघात होऊन तेवढेच निष्पाप नागरिक मृत्युमुखी झाले होते. यातील बहुतांश मृत्युमुखी पडलेले नागरिक हे दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरणारे होते.
सदर प्राणांतीक अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी विना हेल्मेट दुचाकीवर प्रवास करणारे प्रवाशावर अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांच्या सुचनेनुसार व पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे निर्देश प्रमाणे दि. १० फेब्रुवारी २०२६ पासून विदाउट हेल्मेट कारवाई नियमित केली जाणार आहे.
तरी सर्व दुचाकी स्वारांनी प्रवासा दरम्यान हेल्मेटचा वापर करून आपली स्वतः ची काळजी घ्यावी. असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केला.
