अप्पर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश यांच्याकडून राहुरी पोलीस ठाण्याचे कौतुक.
राहुरी पोलीस स्टेशनच्या टिमवर्कचे तसेच ऑपरेशन मुस्कानचे कौतुक व शुभेच्छा.
राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.
राहुरी येथील पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या कार्यकाळात राहुरी पोलीस पथकाने अनेक उत्कृष्ट कामगीरी करुन दाखवील्या आहेत. दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी अहिल्यानगर जिल्ह्याच्या इन्स्पेक्शनच्या वेळी अप्पर पोलीस महासंचालक, फोर्स वन आणि प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई, कृष्ण प्रकाश व पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी राहुरी पोलिस ठाण्याचे कौतुक करुन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचा सन्मान केलाय.
राहुरी पोलीस स्टेशनचे ऑपरेशन मुस्कान अंतर्गत १०५ अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेऊन सुटका करण्यात आली. अपहरण करणाऱ्या आरोपींना अटक करून मुदतीत न्यायालयात दोषारोप पाठवत कारवाई केल्या बाबत संपूर्ण राहुरी पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
तसेच पोलीस स्टेशन बेलवंडी येथे कार्यरत असताना बेलवंडी परिसरात वेगवेगळे राज्यातील विविध रेल्वे स्टेशन वरून किडनॅप करून आणलेल्या व वेठबिगारीत बंदिस्त जीवन कंठणाऱ्या गुलामगिरीचे जीवन जगणाऱ्या २३ वेठबिगारांच्या मुक्तते बाबतही पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे व बेलवंडी पोलीस स्टेशनच्या तत्कालीन टीमचे कौतुक करत प्रशस्ती पत्र दिले.
