Type Here to Get Search Results !

पुणे - अभय योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ, गणेश बिडकरांच्या मागणीला तत्काळ यश

 अभय योजनेस 15 मार्चपर्यंत मुदतवाढ, गणेश बिडकरांच्या मागणीला तत्काळ यश



सभागृह नेते गणेश बिडकरांच्या मागणीला तात्काळ यश, अभय योजनेला एक महिन्याची मुदतवाढ


पुणे प्रतिनिधी : महापालिकेच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेची मुदत १५ फेब्रुवारी रोजी संपणार होती. या पार्श्वभूमीवर योजनेस एक महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. या मागणीचा सकारात्मक विचार करत महापालिका कर विभागाकडून तात्काळ निर्णय घेत अभय योजनेस १५ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.


अभय योजनेअंतर्गत मिळकतकराच्या थकीत रकमेवर ७५ टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत सुमारे १ लाख ३५ हजारांहून अधिक मिळकतधारकांनी या योजनेचा लाभ घेतला असून तब्बल ८०१ कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल महापालिकेला प्राप्त झाला आहे.


“अभय योजनेला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेचा महसूल वाढवतानाच नागरिकांना मोठी सवलत देणारी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. आणखी काही थकबाकीदारांना संधी मिळावी यासाठी मुदतवाढ आवश्यक होती. प्रशासनाने तत्काळ सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आभार. मुदतवाढीमुळे अधिकाधिक नागरिकांनी पुढे येऊन थकीत कर भरावा आणि शहराच्या विकासात योगदान द्यावे", अशी प्रतिक्रिया गणेश बिडकर यांनी दिली.