Type Here to Get Search Results !

पुणे - प्रभाग ०९ विकासासाठी अमोल बालवडकर-बाबुराव चांदेरे मैदानात; आयुक्तांकडे निधीची जोरदार मागणी


 


प्रभाग ०९ विकासासाठी अमोल बालवडकर-बाबुराव चांदेरे मैदानात; आयुक्तांकडे निधीची जोरदार मागणी



पुणे प्रतिनिधी : प्रभाग क्रमांक ०९ मधील पायाभूत सुविधा विकासाला गती देण्यासाठी नगरसेवक अमोल बालवडकर आणि नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची जोरदार मागणी केली. आगामी महापालिका अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करण्यात यावी, यासाठी यावेळी निवेदन सादर करण्यात आले.

बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे, पाषाण, सुतारवाडी व सोमेश्वरवाडी या परिसरातील प्रलंबित मुख्य रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करणे, मुख्य रस्त्यांलगत नवीन पदपथ उभारणे तसेच अपूर्ण पदपथ विकसित करणे, पाषाण तलावाचे पर्यटनदृष्ट्या विकासकाम हाती घेणे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

तसेच सुस-म्हाळुंगे परिसरातील ड्रेनेज लाईन, रस्ते व पथदिवे उभारणी, बाणेर-बालेवाडी भागातील उद्याने व मैदाने विकसित करणे, तसेच परिसरातील स्वच्छता व्यवस्था सक्षम करण्यासाठी नवीन बीआरसी गाड्या, घंटागाड्या व गार्डन वेस्ट वाहन उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली.

प्रभागातील नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि प्रलंबित विकासकामे लवकर मार्गी लागावीत, यासाठी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नगरसेवक अमोल बालवडकर व बाबुराव चांदेरे यांनी व्यक्त केली. प्रशासनाकडून याबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.