Type Here to Get Search Results !

राहुरी - माय लेकाला लाकडी दांड्याने मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल.

 



माय लेकाला लाकडी दांड्याने मारहाण, दोघांवर गुन्हा दाखल.


राहुरी प्रतिनिधी- मनोज साळवे.


काहीएक कारण नसताना आरोपींनी दोघां माय लेकाला शिवीगाळ करुन लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे दि. ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. 


शरद रावसाहेब सरोदे, वय ३८ वर्षे, धंदा ड्रायव्हर, रा. गुंजाळे, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शरद सरोदे हे गुंजाळे बस स्टॅण्डवर गेले होते. त्यावेळी आरोपीने शरद सरोदे यांना काहीएक कारण नसताना रस्त्यावर खाली पाडुन त्यांच्या मोटार सायकलचे हेल्मेट काढुन मारले.


त्यानंतर सायंकाळी ७ वाजता शरद सरोदे व त्यांची आई आशाबाई असे त्यांच्या दारात उभे असताना तेथे आरोपी आले आणि शिवीगाळ करुन लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच तुम्ही जर आमचे विरुध्द पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुमचे विरुध्द मी पोलीस स्टेशनला काहीही खोटी तक्रार देईल, अशी धमकी दिली व तेथुन निघुन गेले. 


शरद रावसाहेब सरोदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विकास सुधाकर सरोद व एक अनोळखी इसम, दोघे रा. गुंजाळे, ता. राहुरी, यांच्यावर गुन्हा रजि. नं. १४५/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५१ (२), ३५२, ३ (५) गुन्हा दाखल करण्यात आला. पुढिल तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.